AAYUSH KOMKAR MURDER CASE: पुण्यातील आयुष कोमकर हत्याप्रकरणात (AAYUSH KOMKAR MURDER CASE) एक मोठी अपडेट समोर आली.
आयुष कोमकर याच्यावर सोमवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले..
त्यानंतर पुढे पोलिसांनी मोठी कारवाई केली..
BANDU ANDEKAR ARREST : आयुष कोमकर प्रकरणात बंडू आंदेकरसह 6 जणांना अटक
आंदेकर टोळीचा प्रमुख आणि मुख्य आरोपी बंडू आंदेकर सह चार जणांना पुणे पोलिसांनी अटक केली..
हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरात टोळी युद्धाच्या चर्चा सुरू झाल्या असतानाचं पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जातीय…
या प्रकरणात आतापर्यंत काय घडलं आणि पोलिसांनी कोणाकोणाला अटक केली पाहुयात..
गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता आंदेकर टोळीने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेतला.
आंदेकर टोळीने वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी
गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर याच्यावर त्याच्याच घरातील पार्किंग जवळ 9 राऊंड फायर करण्यात आले.
यामध्ये आयुष कोमकरचा जागीच मृत्यू झाला.. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुरुवातीला यश पाटील आणि अमित पाटोळे यांना अटक केली..
काल सोमवारी सायंकाळी मयत आयुष कोमकर याच्यावर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले..
त्यावेळी आयुषचे वडील आणि वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याला नागपूरच्या कारागृहांमधून अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आलं होतं..
त्यावेळी वैकुंठ स्मशानभूमीला अक्षरशः छावणीचं स्वरूप आलं होतं..
Mulshi Accident : मुळशीतील पिरंगुट घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पोचा भीषण अपघात
जवळपास दीडशे पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता…
अंत्यसंस्काराच्या वेळी गणेश कोमकर याला मुलाला पाहून अश्रू अनावर झाले..
ज्यावेळी तो मुलांनी लिहिलेलं एक पत्रही घेऊन आला होता..
त्यावर मजकूर होता पप्पा आय मिस यु.. यावेळी गणेश कोमकर याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांचे आभार मानले..
. अंत्यविधी पार पडल्यानंतर मध्यरात्री पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली.
आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा जणांना पुणे
पोलिसांच्या गुन्हे शाखेने काल रात्री उशीरा अटक केली. बुलढाणा या ठिकाणी पळून जात
असताना गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना अटक केली आहे.
यात बंडू आंदेकरची मुलगी आणि दोन नातू ही असल्याची माहिती समोर आली.
पोलिसांनी सापळा रचून सहा जणांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे.
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर (वय ६०), कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१),
शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर
(वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२),
अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९) अशा १३ जणांचा समावेश आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, वाडेकर आई यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आलीय.