आयफोनचा शौक पडला महागात; पिंपरी चिंचवड शहरात तरुणाची तब्बल इतक्या लाखांची फसवणूक

5060 0

पिंपरी चिंचवड शहरात आयफोन खरेदी करून देतो असं सांगून पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. 25 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर या कालावधीत ही घटना घडली आहे.

या फसवणूक प्रकरणी जगदीश नथुराम आस्वामी यांनी पिंपरी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार रहमान अब्दुल गब्बर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना फिर्यादी कडून पाच आयफोन खरेदी करून देतो असं अमिष दाखवलं आणि त्यासाठी फिर्यादी कडून पाच लाख रुपये घेतले आरोपींना फिर्यादीच्या नावावर आयफोन खरेदी केले मात्र त्यांना न पाठवता कुरियर मध्ये आयफोन गहाळ झाले असं कारण देत उडवा उडवीची उत्तर दिली. दर प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी चिंचवड पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!