22 सेकंदात चाकूने 22 वार, सीसीटीव्हीफुटेज आलं समोर; निर्घृण हत्येमागचं धक्कादायक कारण काय?

134 0

प्रतिस्पर्धी गुंडांना इशारा देण्यासाठी एका गुंडाने निष्पाप मजुराची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक बातमी छत्रपती संभाजी नगर मधून समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, अवघ्या 22 सेकंदांत त्याने मजुरावर चाकूने सपासप 22 जीवघेणे वार केले. या हल्ल्याचा थरकात उडवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागला आहे.

निखिल शिंगाडे (रा. नागसेननगर), असे आरोपीचं नाव आहे. तर अशोक दादाराव शिनगारे (४६, रा. नागसेननगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिनगारे हे मजूर म्हणून काम करतात. ते 8 ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर पडले. पुढे काही अंतरावर असलेल्या त्रिभुवन चौकाच्या जवळ आरोपी निखिल शिंगाडे हा मयत शिनगारे यांच्याशी बोलत होता. या दोघांशी आधीपासून ओळख होती. हे दोघेही बोलत असताना प्रज्योत शिंगाडे आणि अक्षय गायकवाड हे दोघेही तेथे आले. थोडा वेळ बोलल्यानंतर आरोपीने शिंगारे यांची कॉलर पकडली. त्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले.

पुढे काही क्षणातच आरोपीने त्याच्याकडील चाकू नये शिनगारे यांच्यावर वार करायला सुरुवात केली. काही सेकंदातच शिनगारे खाली कोसळले. मात्र त्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर, पोटात हा आरोपी वार करत राहिला. त्याने अवघ्या 22 सेकंदात तब्बल 22 वार केले. ज्यामुळे शिनगारे यांचा जागीच मृत्यू झाला. हे पाहून प्रज्योत आणि अक्षयने पळ काढला. तर हत्या करणारा शिंगाडे हा काहीच न झाल्यासारखं शांततेत निघून गेला.

ही थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तर तात्काळ पोलिसांना घटनास्थळी प्राचारण करण्यात आलं. पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो त्याच परिसरात एका शटरजवळ झोपलेला आढळला. तिथूनच त्याला पोलिसांनी अटक केली.

खुनाचं कारण काय ?

मागच्या वर्षी गुंड निखिल शिंगाडेवर त्याच्याच घराजवळ राहणाऱ्या काही तरुणांनी हल्ला केला होता. त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले होते. ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तो सहा महिने उपचार घेत होता तर त्यातील काही महिने तो कोमात देखील होता. या सगळ्यातूनही त्याची प्रकृती हळूहळू बरी झाली. त्याला पूर्ण बरं वाटू लागल्यानंतर दवाखान्यातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी घरी परतल्यानंतर प्रतिस्पर्धी गुंडांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी त्याने निष्पाप अशोक शिनगारे यांचा खून केला. नागसेननगरात काही तरुणांनी चाकूहल्ला केला होता.

Share This News
error: Content is protected !!