Beed:

पर्वती जनता वसाहतीमध्ये टोळक्याचा धुडगूस, कोयते नाचवत १२ हुन अधिक वाहनांची तोडफोड

738 0

पुणे- स्वारगेटजवळ बुलेट गाडी फोडल्याच्या रागामधून निल्या वाडकर टोळीमधील गुंडांनी पर्वती पायथ्याला असलेल्या जनता वसाहतीमध्ये राडा करत १२ पेक्षा अधिक वाहनांचे नुकसान केले. हा प्रकार बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी कुणाल पिटले, सचिन पासलकर, वैभव राऊत, यश पवार, सौम्या पवार ( सर्व रा . जनता वसाहत ) व त्यांच्या पाच ते सहा साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत संतोष वेळयाप्पा कट्टी ( वय ३७ , रा . गल्ली नंबर ९ जनता वसाहत ) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश वाडकर टोळीतील पाटोळे याची बुलेट स्वारगेटजवळ कोणीतरी फोडली होती. त्याचा राग मनात धरून कुणाल पिटले,
सचिन पासलकर, वैभव राऊत, यश पवार व सौम्या पवार आणि त्यांच्या पाच ते सहा साथीदारांनी जनता वसाहतीतील गल्ली नंबर ९ येथे येऊन डोंगराच्या कडेला पार्क केलेल्या टेम्पो , कार , दुचाकी अशा 12 हून अधिक वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविली .

Share This News
error: Content is protected !!