Buldhana Accident

Buldhana Accident : राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ! 10 जण जखमी

737 0

बुलढाणा : राज्यात सध्या अपघाताचे (Buldhana Accident) प्रमाण वाढतच चालले आहे. ते काही थांबायचे नाव घेईना. आज सायंकाळी मलकापूर नजीकच्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर झालेल्या विचित्र वाहन अपघातात 10 प्रवासी जखमी झाले आहेत. यामधील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कसा घडला अपघात?
एक काळी पिवळी जीप नांदुरा वरून मलकापूर कडे येत होती व ट्रकसुद्धा मलकापूर कडे येत होता. अचानक ट्रकच्या पुढे काही मोकाट गुरे आली. गुरांना वाचविण्याच्या प्रयत्नात ट्रक एका बाजूला झुकला. त्याच वेळी काळी पिवळी ट्रकच्या खाली दबली गेली. आजूबाजूच्या नागरिकानी प्रवाशांना बाहेर काढत मलकापूर उपजिल्हा रुग्णाल्यात भरती केले. दहा जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.

मुंबई ते कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 जिल्ह्यातून जात असून या मार्गावर प्रचंड वाहतूक असते. या अर्धवट रस्त्याचे नुकतेच गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. रस्त्याच्या आजूबाजूला जाळ्या लावल्या नसल्याने रस्त्यावर मोकाट गुरे फिरतात. कुठलीच सुरक्षा व्यवस्था नसल्याने चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

Share This News
error: Content is protected !!