ZP & PANCHAYAT SAMITI PRABHAG:जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

ZP & PANCHAYAT SAMITI PRABHAG: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

103 0

ZP & PANCHAYAT SAMITI PRABHAG:जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

VIDEO NEWS: TOP NEWS MARATHI | MAHARASHTRA LOCAL BODY ELECTION:29 महानगरपालिकासाठी नवा प्रभाग आराखडा तयार केला जाणार

जिल्हा परिषदेअंतर्गत १३ पंचायत समित्यांमधील निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची प्रारुप प्रभागरचना १४ जुलै २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, जिल्हा परिषद पुणे, पुणे जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालये व सर्व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.pune.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या प्रारुप प्रभाग रचनेच्या अनुषंगाने २१ जुलै २०२५ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती व सूचना सादर करता येतील.

MAHARASHTRA LOCAL BODY ELECTION: 29 महानगरपालिकासाठी नवा प्रभाग आराखडा तयार केला जाणार

प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे २८ जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त ११ ऑगस्टपर्यंत सुनावणी घेऊन निर्णय घेणार आहेत.

Maratha Reservation : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मुंबईच्या दिशेची वाहतूक गुरुवारी राहणार बंद

अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत सादर करण्यात येणार आहे,

अशी माहिती समन्वयक अधिकारी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक २०२५ तथा उपजिल्हाधिकारी चारुशिला देशमुख-मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!