राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना राज्याची झेड प्लस सुरक्षा आहे. मात्र नुकतच केंद्रीय गृहमंत्रालयाने शरद पवार यांना झेड प्लस सिक्युरिटी देण्याचा निर्णय घेतला. मात्र असा निर्णय केवळ शरद पवार यांच्याबाबतच घेतला नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना देखील देशाच्या पंतप्रधानांना असते तशाच काहीशा दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर नेमकी कशी असणार आहे ही सुरक्षा पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून
केंद्राकडून नुकतंच काही व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेबाबत नवे निर्णय घेण्यात आले आहेत. यात शरद पवार यांना झेड प्लस तर मोहन भागवत यांना ASL सुरक्षा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. झेड प्लस ही अति महत्त्वाच्या व्यक्तींना दिले जाणारी सुरक्षा असून यामध्ये तीन प्रकार आहेत. पहिला झेड प्लस दुसरा झेड प्लस एनएसजी NSG कव्हर तर तिसरा झेड प्लस विथ ASL कव्हर… या तिन्ही मध्ये फरक काय तर शरद पवार यांना देऊ केलेल्या झेड प्लस सुरक्षेमध्ये एकूण 36 जवानांचा ताफा असतो. यात काही जवान एनएसजी तर काही जवान सीआरपीएफ, सीआयएसएफचे असतात. तर काही राज्य पोलिस दलातील जवान देखील सामील असतात.
शरद पवार यांच्यापेक्षाही वरच्या दर्जाची सुरक्षा ही मोहन भागवत यांना देण्यात आली. झेड प्लस विथ ASL कव्हर सिक्युरिटी म्हणजे काय हेही पाहूया…
झेड प्लस विथ ASL कव्हर सिक्युरिटी ही व्हीव्हीआयपी दर्जाच्या व्यक्तींना दिली जाते. एएसएल म्हणजे एडव्हान्स सिक्युरिटी लायसन… ही सुरक्षा पंतप्रधानांना पुरविलेल्या एसपीजी सुरक्षा कव्हरच्या सारखीच असते. यात जवान केवळ सुरक्षा दिलेल्या व्यक्तींसोबत राहातच नाहीत तर हे व्यक्तीच्या ठिकाणी जाणार असतील त्या ठिकाणी आधीच हे जवान जाऊन सुरक्षेचा आढावा घेतात. स्थानिक पोलिसांकडून त्या ठिकाणचा आणि सुरक्षेचा ताबा घेतात. व्हीव्हीआयपी यांच्या येण्या जाण्याच्या मार्गांचा इमर्जन्सी एक्झिटचा अभ्यास केला जातो. येण्या जाण्याच्या मार्गांवर दुतर्फा जवान आणि साध्या वेशातील सुरक्षारक्षक देखील असतात. त्याचबरोबर या सुरक्षित आय बी चा समावेश असतो. ही सुरक्षा केवळ मोजक्याच लोकांना दिली जाते. अशीच सुरक्षा गृहमंत्र्यांना देखील देण्यात आली आहे.
मोहन भागवत यांना देण्यात येणाऱ्या या सर्वोच्च सुरक्षेची त्यांना गरज का आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर शरद पवार यांच्या सुरक्षित केंद्राने वाढ केल्याने असा अचानक निर्णय का घेतला याबाबत शरद पवार आणि समर्थकांकडून शंका उपस्थित केली जाते. दरम्यान आपल्याला कोणापासून धोका आहे म्हणून ही सुरक्षा दिली जात आहे याची माहिती आधी द्यावी. त्यानंतर सुरक्षा स्वीकारण्यावर निर्णय घेणार असल्यास शरद पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता शरद पवार केंद्राची सुरक्षा स्वीकारणार का याकडे सर्वांचेच लक्ष लागलय.