राज्यातील पोलीस कर्मचारी स्वतःच्या खाजगी गाडीवर “पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस” लिहिलेले सर्रास पाहायला मिळते. मात्र इथून पुढे अशा प्रकारे खाजगी वाहनांवर मजकूर लिहिलेला दिसल्यास त्या वाहनांवर थेट कारवाई होणार आहे. मोटार वाहन अधिनियम, १९८८ व तद्गुषंगीक नियमांतील तरतूदीनुसार कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या खासगी वाहनांवर “पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस” लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करावी अशी तक्रार पत्रकार विकी जाधव यांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाला केली होती. त्यांच्या या तक्रारीनंतर या प्रकारचा आदेश जारी करण्यात आला आहे.
कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्यांनी खासगी वाहनांवर “पोलीस बोध चिन्ह तसेच पोलीस” किंवा वाहनांवर “महाराष्ट्र शासन” अशी पाटी लिहिल्याचे आढळल्यास दोषी वाहनांवर मोटार वाहन अधिनियम, १९८८ नियमांतील तरतूदीनुसार काटेकोरपणे कारवाई करावी असे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे आता खाजगी वाहनांवर “पोलीस” लिहिल्यास महागात पडेल.