महादेव जानकर वाढवणार भाजपाची डोकेदुखी ?; बारामती लोकसभा स्वबळावर लढण्याचा निर्धार

247 0

बारामती: भारतीय जनता पक्षानं आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 45 अभियान सुरू केलं असून या बारामती लोकसभा मतदारसंघात आपलं लक्ष केंद्रित केलं आहे. दरम्यान आता महायुतीचा घटक पक्ष समाज पक्षाच्या एका घोषणेनं भाजपाची डोकेदुखी वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत

बारामतीसह राज्यातील लोकसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर आणि पूर्ण ताकदीने लढवणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक बूथवर दहा युवक तयार करावेत, असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केले.

मागील अनेक दिवसांपासून महादेव जानकर महायुतीत नाराज असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं होतं भारतीय जनता पक्षाकडून मित्र पक्षांना विचारात घेतलं जात नाही अशी टीका देखील जानकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना केली होती आणि आता बारामती लोकसभा मतदारसंघात सह राज्यातील निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार जानकर यांनी व्यक्त केल्यानंतर जानकर महायुतीत राहणार की एकला चलो रे म्हणणार हे पाहणं महत्त्वाचं असेल

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!