पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संग्राम थोपटे भाजपच्या वाटेवर?

591 0

पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातून काँग्रेसला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली असून भोर वेल्हा मुळशी विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसचा हात सोडत भाजपचा कमळ हाती घेणार आहेत.

येत्या रविवारी संग्राम थोपटे हे भाजप प्रवेश करतील अशी माहिती मिळाली आहे

भोर वेल्हा मुळशी मतदारसंघातून संग्राम थोपटे हे तुला तीन वेळा आमदार म्हणून विजयी झाले होते 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शंकर मांडेकर यांनी त्यांना पराभूत केलं. 1972 पासून ते 2019 पर्यंत केवळ 1978 आणि 1999 चा अपवाद वगळता मुळशी मतदारसंघावर थोपटे परिवाराचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं होतं.
1972 मध्ये संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे हे आमदार झाले 1978 मध्ये राष्ट्रवादीच्या संपतराव जेधे त्यांना पराभूत केलं. त्यानंतर 1980 ला पुन्हा अनंतराव थोपटे आमदार झाले त्यानंतर 1985 व 1990 या दोन्ही पंचवार्षिक मध्ये अनंतराव थोपटे हे आमदार झाले मात्र 1999 ला पुन्हा राष्ट्रवादीच्या काशिनाथ खुटवड यांनी त्यांचा पराभव केला. 2004 मध्ये पुन्हा अनंतराव थोपटे आमदार झाले त्यानंतर 2009 2014 आणि 2019 या तीनही निवडणुकांमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे हे आमदार झाले त्यानंतर आता 2024 च्या निवडणुकीत शंकर मांडेकरांनी संग्राम थोपटे 19638 मतांनी पराभव केला.

Share This News
error: Content is protected !!