‘जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली’; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटातील आमदारांना सवाल

436 0

मुंबई: ‘जी गोष्ट सन्मानाने झाली असती ती घातपाताने का केली’ असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना उपस्थीत केला आहे.

मातोश्रीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले. ‘बंडाबाबत मलाही वाईट वाटलं’ मात्र शिवसेना पक्ष प्रमुख हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की माशाच्या डोळ्यातील अश्रू कोणाला दिसत नाहीत.

पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या अधिकृत धनुष्यबाण चिन्हाबाबत देखील भूमिका स्पष्ट केली असून धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही वेगळा करू शकत नसून जे आमच्याकडे असताना गप्प होते ते भजपात जाऊन बोलायला लागले असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

Share This News
error: Content is protected !!