Police pune

पोलीस महासंचालक पदी कोणाची लागणार वर्णी ? ‘या’ 3 वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांची नावं चर्चेत

107 0

ऐन निवडणुकीच्या काळात राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर निवडणूक आयोगाच्या आदेशाने बदली करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्याची मागणी केल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांकडून सुरू होती. त्यांच्यावर अनेक आरोप केले जात होते. आणि अखेर आज रश्मी शुक्ला यांना या पदावरून हटवण्यात आलं आहे. तर यानंतर त्यांच्या जागी राज्यातील अति वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. त्यामुळेच या पदासाठी आता तीन वरिष्ठ पोलिसांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

सध्या मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मात्र रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्यानंतर मुख्य सचिवांनी उद्या दुपारपर्यंत पती वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांची शिफारस करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.

ते तीन अधिकारी कोण ?

रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर पोलीस महासंचालक पदी नियुक्तीसाठी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, रितेश कुमार आणि संजय वर्मा यांची नावं आघाडीवर आहेत. हे तीनही अति वरिष्ठ आयपीएस असल्याने यांच्यापैकीच एकाची वर्णी पोलीस महासंचालक पदी लागू शकते.

विरोधकांचे शुक्लांवर गंभीर आरोप

रश्मी शुक्ला यांचा कार्यकाळ संपल्यानंतरही दोन वर्ष अतिरिक्त नियुक्ती केल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष हे आक्रमक झाले होते. रश्मी शुक्ला यांच्या निष्पक्षपातीपतावर शंका असल्याने त्यांना महासंचालक पदावरून हटवावे अशी मागणी निवडणूक आयोगा कडे करण्यात आली होती. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून त्यांना हटवण्याची मागणी केली होती. रश्मी शुक्ला या भाजपच्या आदेशावरून काम करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्याचबरोबर अजूनही आमचे फोन टॅप केले जातात, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या मागणीला अखेर यश आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!