काँग्रेसची पहिली यादी कधी येणार?; नाना पटोले यांनी सांगितली तारीख

228 0

राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदार संघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.

20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा फाटक कधी होणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे जागावाटप कधी होणार याची माहिती स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

येत्या 20 तारखेला काँगेसची उमेदवारांची पहिली यादी जाहीर होईल असं नाना पटोले यांनी सांगितलं

84 जागांवर आजच्या बैठकीत चर्चा

महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास 90% पूर्ण झालं असून आजच्या काँग्रेसच्या बैठकीत 84 जागांवर महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा झाली असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे