WHAT IS BLACK BOX:अहमदाबाद विमान दुर्घटनेचं कारण 'ब्लॅक बॉक्स' मधून उलगडणार; 'ब्लॅक बॉक्स' म्हणजे नेमकं काय

WHAT IS BLACK BOX:अहमदाबाद विमान दुर्घटनेचं कारण ‘ब्लॅक बॉक्स’ मधून उलगडणार; ‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे नेमकं काय

492 0

WHAT IS BLACK BOX: गुजरातच्या अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला.

टेकऑफ घेताच विमान मेघाणी नगरमध्ये कोसळले. दुर्घटनेत 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

WHAT IS BLACK BOX:अपघातामागचं सत्य उघड करणारा यंत्र!

या धक्कादायक घटनेनंतर आता तपास यंत्रणांकडून ब्लॅक बॉक्सचा शोध घ्यायला सुरुवात झाली.

पाहुयात विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स इतका महत्त्वाचा का मानला जातो आणि तो कसा काम करतो.

12 जून रोजी एअर इंडियाचे ड्रीमलाइनर विमान अहमदाबादमध्ये अपघातग्रस्त झाले.

टेकऑफनंतर अवघ्या काही मिनिटांतच विमान मेघाणी नगर परिसरात कोसळले.
प्रत्येक विमान अपघातानंतर तपास यंत्रणा सर्वात आधी ज्याचा शोध घेतात तो म्हणजे ब्लॅक बॉक्स.

हा बॉक्स म्हणजे विमानाच्या उड्डाणाचे सगळे रेकॉर्ड जपणार यंत्र. विमानाच्या अपघातानंतर तपास यंत्रणांना विमान का कोसळले, याचा शोध घेण्यासाठी ब्लॅक बॉक्सचा उपयोग केला जातो.

याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर असंही म्हणतात. विमानाच्या उड्डाणाशी संबंधित सर्व महत्वाच्या गोष्टी आणि आवाज यामध्ये रेकॉर्ड होतात.

दुर्घटनादरम्यान ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहावा म्हणून तो टायटॅनियमसारख्या मजबूत धातूंपासून बनवला जातो.त्यामुळे मोठा स्फोट,

आगीचा भडका किंवा विमानाचे तुकडे होऊनसुद्धा ब्लॅक बॉक्स बऱ्यापैकी सुरक्षित राहतो.ब्लॅक बॉक्सची संकल्पना 1950 च्या दशकात आली.

ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ डेविड वॉरेन यांनी याचा शोध लावल्याचे मानले जाते.
सुरुवातीला ब्लॅक बॉक्सचा रंग लाल होता आणि याला “रेड एग” असं म्हणायचे.

पण आतल्या भागाचा रंग काळा असल्याने याला “ब्लॅक बॉक्स” म्हणू लागले.

तो जमिनीत पडला तरी दिसावा यासाठी बाहेरील रंग लाल किंवा गुलाबी ठेवला जातो.

प्रत्येक विमानात हा बॉक्स शेवटच्या भागात ठेवला जातो, कारण अपघाताच्या वेळी त्या भागाचे तुलनेने कमी नुकसान होते.

याचं वजन अंदाजे ४.५ किलो असतं.

VIJAY RUPANI LUCKY NUMBER: ‘1206’ विजय रुपाणींचा लकी नंबर आणि त्याचं आकड्याच्या दिवशी झाला मृत्यू

यात दोन भाग असतात – एक कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर जो पायलट आणि क्रू यांचे संवाद रेकॉर्ड करतो,

आणि दुसरा फ्लाइट डेटा रेकॉर्डर जो उड्डाणाशी संबंधित तांत्रिक माहिती टिपतो.

ब्लॅक बॉक्समधील माहितीचे विश्लेषण करण्यात 10 ते 15 दिवस लागू शकतात. तोपर्यंत तपास यंत्रणा इतर पुरावे गोळा करतात

जसं की एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि पायलट यांच्यातील संभाषण.

यावरून तपास अधिक स्पष्ट होतो की पायलटला अडचण समजली होती का, आणि त्याने ती नोंदवली होती का?

Share This News
error: Content is protected !!