दबंग आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचं बिहार विधानसभा निवडणुकीत काय झालं?

32 0

विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून महागठबंधनला मोठा फटका बसला. परंतु बिहारमधील दबंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते..त्यांची या निवडणुकीत कामगिरी नेमकी कशी झाली.. पाहुयात..

बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडीला मोठ बहुमत मिळाला तर काँग्रेस प्रणित गठबंधनला मोठ्या पराभवाला समोर जावं लागलं.. परंतु महाराष्ट्राचे भूमिपुत्र असलेले माजी आयपीएस दबंग अधिकारी आणि माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांचे जावई सुदीप लांडे हे अपक्ष म्हणून बिहार विधानसभा निवडणुकीत उतरले होते..शिवदीप लांडे यांनी जमालपूर आणि अरारिया मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. जमालपूरमध्ये 8 फेरीतील मतमोजणीनंतर त्यांना 2 हजार 73 मते मिळाली. या मतदारसंघात जनता दल युनायटेडचे नचिकेता यांनी 29 हजार 823 मते मिळवून आघाडी घेतली आहे. या दोन्ही मतदारसंघातून शिवदीप लांडे पराभवाच्या छायेत आहेत.शिवदीप लांडे हे मुळचे महाराष्ट्रातील असून त्यांचा जन्म अकोल्यात झाला आहे. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी राहिली असली तरी त्यांची कर्मभूमी कायमच बिहार राहिली आहे. सिंघम अधिकारी म्हणून त्यांची बिहारमध्ये ओळख आहे. त्यांनी बिहारची राजधानी पाटणा, अररिया आणि पूर्णिया जिल्ह्याचे एसपी म्हणून कामकाज पाहिलं आहे. यानंतर ते राज्यपालांचे एडीसी देखील राहिले आहेत. काही काळासाठी त्यांची महाराष्ट्रात देखील बदली झाली होती. तेव्हा ते एटीएसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते. आपल्या दबंगगिरीमुळे ते बिहारमधील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांनी राजकारणात एंट्री घेतली.. आणि बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली परंतु सध्या ते पिछाडीवर आहेत.. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी आधी शिवदीप लांडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून शिवदीप लांडे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा सुरू होती. ते आपले सासरे विजय शिवतारे यांच्या मतदारसंघातून म्हणजेच पुरंदर विधानसभेतून निवडणूक लढवतील, असं सांगितलं जातं होतं.. परंतु महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याऐवजी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणे पसंद केलं..

Share This News
error: Content is protected !!