विशाळगड अतिक्रमण प्रकरण पेटलं, ‘अतिक्रमण खपवून घेऊ शकत नाही’; संभाजीराजे छत्रपती आक्रमक

446 0

विशाळगडावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवावे ही मागणी अनेक दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यातच आज हजारो कार्यकर्त्यांसह संभाजी राजे छत्रपती हे विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. विशाळगड संकटात असताना मी तिथे जाणारच अशी प्रतिक्रिया देत संभाजी राजे हे विशाळगडाकडे रवाना झालेत. या प्रकरणात माझ्यावर गुन्हा दाखल झाले तरी चालेल, त्याचा मला अभिमान असेल अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले संभाजी राजे छत्रपती ?

संभाजीराजे छत्रपती हे शेकडो हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे रवाना झाले आहेत. तिथे पोहोचणे आधी ते बांबावडे या ठिकाणी थांबले होते. तेव्हा शिवभक्तांनी त्यांच्या हातात हातोडा देत विशाळगड अतिक्रमण मुक्त करण्याचे मागणी संभाजीराजेंकडे केली. विशाळगडला जाण्याआधी बांबवडे इथं थांबले होते. यावर सिद्धी जोहरने पन्हाळगडाला वेढा दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज अगदी शिताफीने या वेढ्यातून निष्डून विशाळगडावर पोहोचले होते. त्यावेळी पावनखिंडीत झालेली ऐतिहासिक लढाई लक्षात ठेवून पावनखिंड संग्राम दिन म्हणून 13 जुलै हा दिवस साजरा केला जातो. पण याच संग्राम दिनाच्या दिवशीही विशाळगड आज संकटात आहे. त्यामुळे विशाळगडावरचे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही, अशा कडक शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी इशारा दिला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!