राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची निवड

114 0

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आणि राजस्थानच्या सहप्रभारी विजया रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विजया रहाटकर यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा ही देण्यात आला आहे.

पुढील तीन वर्षासाठी विजया रहाटकर या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी असणार आहेत या अगोदर राहटकर यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणूनही काम पाहिले.

2016 ते 2021 पर्यंत विजयाराहटकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या.

कोण आहेत विजया रहाटकर?

  • भाजपाच्या आक्रमक महिला नेत्या अशी ओळख
  • भाजपाच्या निवडणूक समितीतही केलं काम
  • महाराष्ट्र भाजपा युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष म्हणूनही होती जबाबदारी
  • भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणूनही सांभाळली जबाबदारी

 

Share This News
error: Content is protected !!