VIJAY RUPANI DEATH:गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठा अपघात झाला. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले.

VIJAY RUPANI DEATH: गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचं निधन

1028 0

VIJAY RUPANI DEATH:गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठा अपघात झाला. अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान कोसळले.

या विमानात २४२ प्रवासी होते. आतापर्यंत ३० जणांचा मृत्यू झाला आहे.

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील या विमानात होते.

समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातात विजय रूपाणी यांचं निधन झालं आहे.

गुजरात विमान दुर्घटनेत माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचं निधन

विजय रुपाणी कोण आहेत?

 विजय रुपाणी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.

2012 पर्यंत विजय रुपाणी यांनी राज्यसभा सदस्य म्हणूनही काम केलं असून पंजाब आणि छत्तीसगड राज्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री निवडण्याच्या प्रक्रियेत निरीक्षक म्हणून देखील विजय रूपाणी यांच्याकडे जबाबदारी होती. 

AHMEDABAD PLANE CRASH: गुजरातच्या अहमदाबादमध्ये 242 प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं

२४२ प्रवाशांना घेऊन लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळले.

अहमदाबादच्या मेघनगर परिसरात हा अपघात झाला. उड्डाणादरम्यान विमान कोसळले. विमान कोसळल्यानंतर लगेचच घटनास्थळावरून आकाशात काळा धूर निघताना दिसला.

या विमान अपघातात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

विमान अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केल्यानंतर अवघ्या १ मिनिटातच विमान कोसळले.

असे म्हटले जात आहे की विमान आकाशात सुमारे ६२५ फूट उंचीवर पोहोचताच कोसळले.

एअर इंडिया बी७८७ ड्रीमलायनर विमानात २४२ लोक होते, ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते.

कॅप्टन सुमित सभरवाल हे फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्यासह विमानाचे नेतृत्व करत होते.

Share This News
error: Content is protected !!