VICE PRESIDENT ELECTION NDA CANDIDATE: उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (VICE PRESIDENT ELECTION) एनडीए आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (C.P. Radhakrishnan) एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार असणार आहेत.
उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए आघाडीचे उमेदवार ठरले
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा केली असून 21 ऑगस्ट रोजी ते आपला उपराष्ट्रपती पदाचा अर्ज दाखल करणार आहेत.
Vice President Jagdish Dhankhar resigns: जगदीश धनकड यांचा उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा
कोण आहेत सी.पी. राधाकृष्णन
चंद्रपुरम पोन्नुसामी राधाकृष्णन अर्थात सी.पी. राधाकृष्ण हे ३१ जुलै २०२४ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत.
त्यांनी फेब्रुवारी २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून आणि मार्च २०२४ ते जुलै २०२४ दरम्यान तेलंगणाचे राज्यपाल (अतिरिक्त कार्यभार) आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपाल (अतिरिक्त कार्यभार) म्हणूनही काम पाहिले.
ते भारतीय जनता पक्षाकडून कोइम्बतूर येथून दोनदा लोकसभेवर निवडून आले होते .
राधा कृष्णन हे तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील होते .
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झालेल्या सी.पी. राधाकृष्णन यांचा कसा आहे राजकीय प्रवास?
MAHARASHTRA LOCAL BODY ELECTION: 29 महानगरपालिकासाठी नवा प्रभाग आराखडा तयार केला जाणार
DHANAJAY MUNDE ON ANJALI DAMANIYA | अंजली दमानियांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
PUNE MNS PROTEST ‘पुणे महानगरपालिकेत मनसे कार्यकर्ते आणि आयुक्त भिडले’; मनसैनिकांवर गुन्हा दाखल