जेष्ठ कवी ना.धो. महानोर यांचं निधन

697 0

पुणे: साहित्यिक कवी ना.धो.महानोर यांचं निधन झाले होते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पळसखेड या त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटीलेटरवर होते.

१६ सप्टेंबर १९४२ मध्ये जन्मलेल्या ना.धो. महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा बोलीभाषांचा वापर केला आहे.

ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’ हे त्यांचे गाजलेले कविता संग्रह होते.

१९७८ साली महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार म्हणून देखील ना.धो. महानोर यांनी काम पाहिलं आहे.

Share This News
error: Content is protected !!