VASAI FORT VIRAL VIDEO: शिवरायांच्या वेशातील फोटोशूटवरून RD KING आणि सुरक्षारक्षकाचे वाद

70 0

शिवरायांच्या महाराष्ट्रातील किल्ल्यावर शिवरायांच्या वेशात फोटोशूट करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला परप्रांतीय सुरक्षारक्षकाकडून अडवण्यात आलं. किल्ल्यांवर अनेक जोडपी येतात, अनेकांकडून अश्लील कृत्य केली जातात, अनेकदा किल्ल्यांवर दारू पार्ट्या रंगतात. मात्र त्या सगळ्यावर वचक ठेवण्याऐवजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये फोटोशूट करणाऱ्या तरुणाला दमदाटी करण्यात आली. रुपेश हुलावळे असं या तरुणाचं नाव असून तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. नेमकं त्याच्याबरोबर काय घडलं पाहूया..‌

आरडी किंग नावाने प्रसिद्ध असलेला रुपेश हुलावळे सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतो. दिवाळीचा पार्श्वभूमीवर त्याला छत्रपती शिवरायांच्या वेशात वसई किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरात फोटोशूट करायचं होतं. त्यासाठी तो किल्ल्यावर पोहोचला. मात्र त्यावेळी त्याला परप्रांतीय सुरक्षारक्षकाकडून अडवण्यात आलं. अनेक वर्ष महाराष्ट्रात राहत असूनही या सुरक्षारक्षकाला मराठी येत नव्हतं. दुसरीकडे गडकिल्ल्यांवर इतके गैरप्रकार सुरू असताना केवळ पारंपारिक पोशाखात सुरू असलेल्या फोटोशूटला विरोध का ? असा सवाल उपस्थित करत रुपेशने या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

सुरक्षारक्षकाला मराठी यायलाच हवं, असं सांगण्याचा या व्हिडिओ मागचा हेतू नसून जे लोक अनेक वर्ष महाराष्ट्रात राहतात, काम करतात मात्र मराठी शिकत नाहीत.‌ उलट आपणच त्यांच्याशी हिंदीत बोलावं असं ज्यांना वाटतं, ते अयोग्य असल्याचं मतही रुपेश हुलावळे यानं व्यक्त केलं.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडतोय. गडकिल्ल्यांवर अनेकदा अश्लील वर्तन केलं होतं. हुल्लडबाज‌ तरुणांचे ग्रुप पार्ट्या करण्यासाठी किल्ल्यांवर येतात. अशा गोष्टी रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असताना केवळ पारंपारिक पोषाखात फोटोशूट करणाऱ्याला का अडवलं ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Share This News
error: Content is protected !!