वंचित बहुजन आघाडीकडून 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; वाचा कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?

95 0

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष तयारी करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदार संघासाठी एकाच टप्प्यात म्हणजे 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर चर्चांवर चर्चा आणि बैठकांवर बैठका होत असताना वंचित बहुजन आघाडीने मात्र उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली असून आज वंचित बहुजन आघाडीची 30 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर झाली आहे.

 

या अगोदर 21 सप्टेंबर रोजी 11 उमेदवारांची तर 9 ऑक्टोबर रोजी दहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली होती.

आजच्या 30 उमेदवारांसह आतापर्यंत वंचित बहुजन आघाडी कडून 51 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!