केंद्रीय कामगार मंत्र्यांची कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालयाला भेट

238 0

पुणे: केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह बिबवेवाडी येथील कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, महामंडळाचे विभागीय आयुक्त प्रणयकुमार सिन्हा, वैद्यकीय अधीक्षक इम्मान्यूयेलू कोटा, प्र. उपनिदेशक हेमंत कुमार पांडेय आदी उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री  यादव यांच्या हस्ते रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आमदार मिसाळ यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली.

Share This News
error: Content is protected !!