महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर घटनापिठासमोर होणाऱ्या सुनावणीबाबत अनिश्चितता; अद्याप कामकाजात समावेशच नाही

254 0

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली, यानंतर न्यायालयाने 5 न्यायाधिशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवलं 25 ऑगस्ट रोजी घटनापीठासमोर सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

मात्र उदय होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अद्याप त्याचा समावेश नसल्याची माहिती आहे. त्यामुळे उद्या सकाळी ऐनवेळी हे प्रकरण सुनावणीस येणार का याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे सोपवण्यात आलं आणि त्यावरील सुनावणी गुरुवारी होणार असं जाहीर करण्यात आलं होतं.

गुरुवारी पाच न्यायमूर्तींचे खंडपीठ गठीत होऊन निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबद्दल निर्णय देणे अपेक्षित होतं. पण अद्याप या घटनापीठाची रचना नाही. आज संध्याकाळपर्यंत हे प्रकरण कामकाजामध्ये समावेश नाही, तसेच या घटनापीठासंबंधी कोणतीही माहिती अद्याप समाविष्ट नाही.

Share This News
error: Content is protected !!