Traffic Police e-Challan Maharashtra: वाहतूक पोलिसांच्या इ-चलन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा (Traffic Police e-Challan Maharashtra) आदेश पुन्हा एकदा जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना आणि अंमलदारांना आता इ-चलन करताना खाजगी मोबाईल फोनचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला गेला आहे.
हा आदेश अपर पोलीस महासंचालक , प्रवीण साळुंखे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आला असून, यामागील मुख्य कारण म्हणजे अनेक ठिकाणी खाजगी मोबाईलचा (Traffic Police e-Challan Maharashtra) गैरवापर करून चुकीची चलने जारी केल्याच्या तक्रारी. इ-चलनसाठी अधिकृत यंत्रणा उपलब्ध असतानाही, काही अधिकारी त्यांच्या वैयक्तिक मोबाईल फोनवर वाहनांचे फोटो घेतात आणि नंतर त्या फोटोचा वापर करून इ-चलन प्रणालीत चालान अपलोड करतात. यामुळे चुकीची माहिती नोंदवल्याचे प्रकार घडत आहेत.
MUMBAI KONARK EXPRESS INCIDENT: धावत्या ट्रेनमधील वादाचा शोकांतिका शेवट
ही बाब नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत उपस्थित करण्यात आली. विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींनी (Traffic Police e-Challan Maharashtra) याबाबत तक्रार केली होती. काही अधिकारी एकाच वेळी अनेक वाहनांचे फोटो काढून, गरजेनुसार निवडकपणे चलन जारी करतात, असा आरोप होता. यामुळे वाहनचालकांना अन्यायकारक दंड भरावा लागत असल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले.
TIPU PATHAN GANG: टिपू पठाण गॅंगची बँक खाती फ्रिज; बेकायदा बांधकाम पाडायला सुरुवात
मंत्र्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार आता नव्याने आदेश देण्यात आला असून, तो मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, पिंपरी-चिंचवडसह सर्व पोलीस आयुक्तालये, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि महामार्ग पोलीस ठाण्यांना पाठवण्यात आला आहे.
या आदेशाचा उद्देश म्हणजे इ-चलन प्रक्रियेत प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता राखणे, तसेच पोलिस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवणे. यापूर्वीही असे आदेश देण्यात आले होते, पण काही विभागांकडून ते गांभीर्याने न पाळल्याने आता त्याची अंमलबजावणी अधिक कडकपणे होणार आहे.