ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तिसरी यादी जाहीर; तिसऱ्या यादीत ‘या’ तीन चेहऱ्यांना उमेदवारी

राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून सर्वच पक्ष तयारीला लागलेत यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपली उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

या अगोदर 65 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती त्यानंतर आज सकाळीच 15 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आणि आता तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी तीनही घटक पक्षांमध्ये 90 90 90 असा समसमान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असून यानंतर तीनही पक्षांकडून जागावाटप करण्यात येत आहे.

कोणत्या तीन उमेदवारांना मिळाली उमेदवारी?

वर्सोवा हरून खान

घाटकोपर पश्चिम संजय भालेराव

विलेपार्ले संदीप नाईक