महाराष्ट्रासह संपूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्या पाठीशी – विजय कुंभार

195 0

पुणे: देशातच नव्हे जगात आपल्या अभिनव, कल्पक आणि प्रामाणिक उपक्रमांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी केंद्र सरकारचा पोपट बनलेली केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय आज सकाळी दाखल झाली.

अवघ्या २ दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीतील शैक्षणिक क्रांतीबद्दल अमेरिकेतील जगप्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्समध्ये राजधानी दिल्लीतील बदललेल्या प्रगत शिक्षण पद्धतीचे कौतुक करण्यात आले होते, त्याचीच पोटदुखी म्हणून की काय आज केंद्र सरकारने सीबीआयची धाड मनीष सिसोदिया यांच्या घरावर टाकली आहे असं मत आम आदमी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आलं असून “जनताभिमुख केजरीवाल सरकारच्या कामात अडचणी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, ईडी या संस्थांच्या माध्यमातून आपच्या एक एक मंत्र्यांना विनाकारण अडकवू पाहत आहे.

याआधी सत्येंद्र जैन आणि आता मनीष सिसोदिया. देशातील जनता मोदी सरकारचा हा कुटील डाव ओळखून आहे, महाराष्ट्रासह संपूर्ण देश मनीष सिसोदिया यांच्या पाठीशी आहे. असं आपचे राज्य संघटक विजय कुंभार यांनी सांगितलं

Share This News
error: Content is protected !!