आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून महाविकास आघाडी मधील जोरदार बैठका सुरू आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गट 100 जागांवर अडून बसल्याने महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही कायम आहे.
मागील तीन दिवसांपासून महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागा वाटपावरून बैठकांचे सत्र सुरू आहे. महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाला कशात जास्तीत जास्त जागा मिळते यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर काँग्रेस पक्षाचे मनोबल वाढल्याचं दिसून येत असून, काँग्रेस पक्ष राज्यात 125 जागा लढवण्यासाठी आग्रही आहे. तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाला जेवढा जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हालाही मिळावा यासाठी ठाकरे गट ही आग्रही असल्याची माहिती आहे. परंतु काँग्रेस पक्षाकडून ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीत जास्त जागा मिळणार नाहीत असा सर्वेचा दाखला दिला जात असून त्यामुळे ठाकरे गट सध्या आक्रमक पवित्र्यात आहे. काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात मिळालेल्या यशानंतर काँग्रेस पक्ष नमतं घेण्यास तयार नाही. त्यामुळे पुन्हा मी भाजपासोबत जाऊ शकतो अशा घमक्या ठाकरे गटाकडून काँग्रेस पक्षाला दिल्या जात असल्याचे सांगितले जातयं. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली संजय राऊत यांनी नवी दिल्ली यांची भेट घेतली अशा बातम्या ठाकरे गटाचा दबावाच राजकारण असल्याचे सांगण्यात येतंय. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला मर्या देऊन जास्त जागा द्यायच्या नाहीत कारण सत्तेवर आल्यास आपलं उपद्रव्य मूल्य कमी होईल यासाठी ठाकरे गट आणि पवार गटाकडून डावपेच खेळले जातं आहेत. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी तिन्ही पक्षांनी मिळून आम्हाला 25 जागा सोडाव्यात अशी मागणी करत आहे. महाविकास आघाडीमध्ये झालेल्या मागील तीन बैठकांमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नसताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे मी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दसऱ्यापर्यंत जागावाटप पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे. परंतु काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट 100 पेक्षा जास्त जागांवर ठाम असल्याने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली. आता महाविकास आघाडीची पुढील बैठक 8 ते 10 ऑक्टोबर दरम्यान होणार असल्यानं या बैठकीत तरी जागावाटपावर अंतिम तोडगा निघतो का? की महाविकास आघाडीत बिघाडी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.