crime in pune school (not real image)

शाळांमधील शिव्या रोखण्यासाठी सरकारनं घेतला हा महत्त्वाचा निर्णय

554 0

पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या शाळा आणि खाजगी शाळांमध्ये शिव्या मुक्त समाज अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळें पिंपरी चिंचवड शहरातील शाळात आता आई – बहीण वरून दिल्या जाणाऱ्या अश्लील शिव्या आता पूर्णपणे हद्दपार होणार आहेत.

राज्यात स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना वाढ झाली असून बदलापूर प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाने लैंगिक अत्याचार कमी व्हावे याकरिता महिलांचा आदर करणे मुलांना शिकवण आणि त्यांच्या लिंग समानतेच्या गोष्टी रुजवणे महत्त्वाचा आहे. आणि त्याची शिकवण हे कुटुंबातून आणि शाळेतून व्हायला हवी असं म्हटलं होतं. आता माता भगिनी आणि सन्मानासाठी राज्य शासनाकडून शिव्या मुक्त समाज अभियान राबवायला आता सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेने शहरातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकाला पत्र लिहून स्त्रीत्वाचा अपमान होतो अशा अश्लील शिव्यांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तसेच शिव्या मुक्त समाजासाठी विद्यार्थ्यांना शपथ देण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना देण्यात आल्या आहेत.