शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पाचवी यादी जाहीर; माढामधून अभिजीत पाटील तर मोहोळमधून उमेदवार बदलला
महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक यांची घोषणा झाली असून 288 विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे.
या पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून या यादीत माढा विधानसभा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे.
तर मोहोळ मतदारसंघातून सिद्धी कदम यांना उमेदवारी मिळाली होती मात्र आता सिद्धी कदम यांच्याऐवजी राजू खरे यांना उमेदवारी मिळाली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं जाहीर केलेले पाच उमेदवार कोणते?
- माढा – अभिजीत पाटील
- मुलुंड – संगीता वाजे
- मोर्शी – गिरीश कराळे
- पंढरपूर – अनिल सावंत
- मोहोळ – राजू खरे
