सोशल मीडियाच्या युगात संयम आणि सहनशीलतेचा अंत – धनंजय चंद्रचूड

821 0

समाजमाध्यमांवरील खोटय़ा बातम्यांच्या युगात सत्याचा बळी गेला आहे. संयम आणि सहिष्णुतेची कमतरता असलेल्या युगात आपण राहात आहोत, असे मत सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

अमेरिकन बार असोसिएशनने आयोजित केलेल्या एका परिषदेत बोलताना, सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की प्रवास आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या जागतिक प्रगतीमुळे मानवतेने प्रगती केलेली असली तरीही व्यक्ती म्हणून आपण ज्या गोष्टींवर विश्वास ठेवतो त्याचा स्वीकार करण्याची तयारी कमी होत चालल्याने मानवतेचे नुकसान झाल्याचेही ते म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!