मुंबई : हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती आहे. अर्धा देश महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला ‘मराठी’ भाषा शिकण्याची गरज आहे, अशाप्रकारची बॅनरबाजी करून मनसेने भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना भाजपने बॅनरबाजी करून राज ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजपने सोमवारी राज ठाकरे यांच्या घराच्या परिसरात बॅनरबाजी केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता मनसेने बॅनर लावले आहेत.