विरोधी पक्षनेते अजित पवार आज माध्यमांसमोर येणार; ‘त्या’ विधानावरून काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

212 0

मुंबई: छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं विधान राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केल्यांनतर राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले.

त्यानंतर अनेक ठिकाणी अजित पवारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आली होती. नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली होती.

त्यानंतर आता अजित पवार आपली भूमिका स्पष्ट करणार असून दुपारी 2 वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आपली भूमिका मांडणार आहेत

आता या पत्रकार परिषदेत आजित पवार नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय…

Share This News
error: Content is protected !!