नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर हादरले! 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू

497 0

नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी आहे. शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाला.

नांदेड येथील शासकीय रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्यानेच हे मृत्यू झाल्याचे आरोप होत आहे. दरम्यान, आता छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय घाटी रुग्णालयात देखील 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या कारणांनी हे मृत्यू झाले असून, यात दोन नवजात बालकांचे देखील समावेश आहे. संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यामुळे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. विशेष म्हणजे रुग्णालयात नेहमीच औषधांचा तुटवडा असल्याचे आरोप होतात. या रुग्णालयात 120 प्रकारचे औषधे लागतात. परंतु, यातील अनेक औषध उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात चिठ्ठी देऊन बाहेरून औषध आणण्यासाठी सांगितले जाते.

Share This News
error: Content is protected !!