Tejas MK1A Production Line HAL Nashik: Inauguration of Tejas and HTT-40 Production Lines at HAL's Nashik Facility

Tejas MK1A Production Line HAL Nashik: एचएएलच्या नाशिक सुविधेत तेजस आणि एचटीटी-४० च्या उत्पादन लाईन्सचे उद्घाटन

63 0

Tejas MK1A Production Line HAL Nashik: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या सुविधेत तेजस एमके१ए लढाऊ विमानासाठी तिसऱ्या उत्पादन लाईन व (Tejas MK1A Production Line HAL Nashik) HTT-40 ट्रेनर विमानासाठी दुसऱ्या लाईनचे उद्घाटन केले. त्यांनी या नवीन उत्पादन लाईनवर तयार झालेल्या पहिल्या तेजस एमके१ए विमानाला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी सिंह यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचा गौरव करत सांगितले की, पूर्वी ६५-७०% लष्करी उपकरणे आयात केली जात होती, पण आता ६५% पेक्षा अधिक उपकरणे देशातच तयार केली जात आहेत. त्यांनी १००% स्वदेशी उत्पादनाचे लक्ष्य अधोरेखित केले.

Illegal liquor seizure Bhor: भोरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; 280 लिटर अवैध हातभट्टी दारूसह एक सेंट्रो कार जप्त

सिंह यांनी २०१४ नंतरच्या बदलांवर भाष्य करत सांगितले की, यापूर्वी संरक्षण उत्पादन सार्वजनिक क्षेत्रात मर्यादित होते, खासगी क्षेत्राचे योगदान कमी होते आणि प्रगत तंत्रज्ञानावर भर नव्हता. मात्र आता देशातच लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रे, (Tejas MK1A Production Line HAL Nashik) इंजिन्स आणि इलेक्ट्रॉनिक प्रणाली तयार केल्या जात आहेत. ते म्हणाले की, २०१४-१५ मध्ये भारताचे संरक्षण उत्पादन ₹46,429 कोटी होते, जे २०२४-२५ मध्ये ₹1.5 लाख कोटींवर गेले. संरक्षण निर्यातही ₹1,000 कोटींवरून ₹25,000 कोटींवर पोहोचली आहे. २०२९ पर्यंत उत्पादन ₹3 लाख कोटी आणि निर्यात ₹50,000 कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट आहे.

Beed Farmer Robbery: बीड जिल्ह्यात चोरांची दहशत! शेतकरी कुटुंबाला मारहाण करत लाखोंचा ऐवज लंपास 

त्यांनी एआय, सायबर युद्ध, ड्रोन आणि नेक्स्ट जनरेशन एव्हिएशन क्षेत्रांमध्ये भारताने आघाडीवर राहावे लागेल असे सांगून, HAL ला मानवरहित प्रणाली आणि नागरी उड्डाण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. सिंह (Tejas MK1A Production Line HAL Nashik) यांनी HAL च्या नाशिक विभागाचे योगदान, ऑपरेशन सिंदूरमधील सहभाग आणि ब्राह्मोस क्षेपणास्त्र एकत्रीकरणाचे काम याबद्दल प्रशंसा केली. त्यांनी MRO (देखभाल व दुरुस्ती) सुविधांचे डिजिटल व शाश्वत रूपांतर कौतुकास्पद असल्याचे म्हटले. HAL चे अध्यक्ष डॉ. डी.के. सुनील यांनी सांगितले की, या नव्या लाईन्समुळे १,००० रोजगार निर्माण झाले असून ४०+ उद्योग सहभागी झाले आहेत. तेजस एमके१ए ची नवीन लाईन वर्षाला ८ विमाने तयार करू शकते, ज्यामुळे एकूण उत्पादन क्षमता २४ विमाने प्रतिवर्ष होईल. HAL नाशिकने आजवर ९०० हून अधिक विमाने तयार केली असून १,९००+ चे ओव्हरहॉलिंग केले आहे.

Share This News
error: Content is protected !!