मोठी बातमी! बहुचर्चित लवासा प्रकरणी पवार कुटुंबियांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

563 0

पुणे: पुण्यातील बहुचर्चित लवासा प्रकरणासंदर्भात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली होती. या निर्णयाविरोधात याचिका करते नानासाहेब जाधव यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य काही जणांना सर्वोच्च न्यायालयाने सहा आठवड्यात उत्तर सादर करण्याची नोटीस पाठवली आहे.

याप्रकरणी शरद पवार अजित पवार सुप्रीया सुळे  सदानंद सुळे आणि अजित गुलाबचंद यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. अजित पवारांनी अधिकाराचा गैरवापर केला तसेच लवासा कॅार्पोरेशनची स्टॅम्प ड्यूटी माफ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हिल स्टेशन करणे बेकायदा होते. पर्यावरण तसेच इतर नियमांचे उल्लंघन केले आहे असं या याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!