माजी खासदारांची पेन्शन बंद करा; महाराष्ट्रातील ‘या’ काँग्रेस खासदाराचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र

989 0

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू असताना ३०० माजी खासदारांचे आश्रित परिवार सोडून आर्थिक दृष्ट्यासक्षम असलेल्या ४ हजार ४९६ माजी खासदारांची पेन्शन बंद करावी, अशी मागणी काँग्रेस खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे केली आहे.

भारतीय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकूण 4796 माजी खासदार आहेत. त्यांना दरवर्षाला 50 कोटी रुपयांची रक्कम पेन्शनच्या माध्यमातून प्रदान केली जाते. यामध्ये जवळपास 300 माजी खासदारांचे आश्रित परिवार देखील सहभागी आहेत. माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, बहन मायावती, सिताराम येचुरी, मनी शंकर अय्यर, रेखा जी, चिरंजीव आणि अनेक मोठ्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या माजी खासदारांची निवृत्ती वेतनाची रक्कम बंद करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

Share This News
error: Content is protected !!