ST-Bus

ST BUS PRICE HIKE: प्रवाशांच्या खिशाला लागणार कात्री; लालपरीचा प्रवास महागणार

134 0

एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता प्रवास महागणार आहे. एसटी महामंडळाने भाडेवाढ करण्याचा विचार केला असून 14.13 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारला दिला आहे.

एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना 100 रुपयांच्या तिकिटामागे 15 जास्तीचे मोजावे लागणार आहेत.

उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान याआधी 27 नोव्हेंबर 2021 रोजी तिकीटदरवाढ झाली होती. माहितीनुसार, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी बसच्या दरवाढीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई-पुणे प्रवास तब्बल 50 ते 60 रुपये महाग होण्याची शक्यता आहे.

Share This News
error: Content is protected !!