SOLAPUR POLICE ON SHARANU HANDE: भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांच्या अपहरणाच्या घटनेनंतर सोलापुरात खळबळ उडाली आहे.
4 तासांत पोलिसांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
कर्नाटकात जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
TOP NEWS MARATHI: SOLAPUR POLICE ON SHARANU HANDE: शरणू हांडे प्रकरणाचा पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
सोलापूरमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे यांचे फिल्मी स्टाईलने अपहरण करण्यात आले.
अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार करण्यात आली.
ही पथके सरळ कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील इंडि तालुक्याकडे रवाना झाली.
तिथे लोकेशन मिळताच पथकांनी अचानक धाड टाकली.
यावेळी अपहरणकर्त्यांनी शरणू हांडे यांना मारहाण केली होती आणि चाकूने जखमी केलं होतं
RAJ THACKERAY ON BMC ELECTION : मनसे 100% महापालिका निवडणुकीत सत्तेवर येणार ; राज ठाकरेंचा एल्गार..!
.पोलिसांनी तत्काळ त्यांना वाचवून शासकीय रुग्णालयात दाखल केलं.
JALNA KALYANI VAYAL CASE: मित्राच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून कल्याणी वायाळ या तरुणीने संपवलं जीवन
मुख्य आरोपी अमित सुरवसे, सुनील पुजारी, दीपक मेश्राम आणि अभिषेक माने यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
गुन्ह्यात वापरलेलं वाहन आणि चाकू पोलिसांनी जप्त केलं.
PUNE VIMANNAGAR PUB BIRTHDAY VIDEO:भाई का बर्थडे”; पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून पबच्या पार्किंगमध्येच शंभरहून अधिक गुंडांची ‘डीजे पार्टी’
एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्या करण्याच्या उद्देशाने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.