शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध; कोणत्या आहेत मोठ्या घोषणा?
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष जोरदार तयारी करत असताना महायुतीतील तीनही पक्षांनी कोल्हापुरात केलंय काम भारी आता पुढची तयारी म्हणत आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता.
त्यानंतर काल मुंबईत मुंबई महाराष्ट्र विकासाची पंचसूत्री म्हणत महाविकास आघाडी नाही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला वंचित बहुजन आघाडी कडूनही जोशाबा समतापत्र नावानं जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
कोणत्या आहेत घोषणा?
- प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य आणि देखणं मंदिर उभं करणार
- जात धर्म पंथ न पाहता महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला मुलीप्रमाणे मोफत शिक्षण देणार
- शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल आणि साखर या पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर पाच वर्षांसाठी स्थिर ठेवणार
- प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करणार
- ‘विकेल ते पिकेल’ या धोरणानुसार शेतकऱ्यांच्या पिकाला हमखास भाव मिळवून देणार
- महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार
- धारावीकरांना धारावीतच घर उपलब्ध करून देणार
- बारसू येथील रिफायनरी प्रकल्प रद्द करणार
- निसर्ग उद्ध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांना परवानगी न देता पर्यावरण स्नेही प्रकल्पांना प्रोत्साहन देणार
