लक्ष्मण हाके यांच्या खांद्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी

234 0

सोलापूर: धनगर समाजाचे नेते आणि राज्य मागासवर्गीय समितीचे सदस्य लक्ष्मण हाके यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य लक्ष्मण हाके यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं हाके यांची प्रवक्तेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेनेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

लक्ष्मण हाके यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव झाला. शिवसेनेकडून शहाजीबापू पाटील यांनी देशमुखांना पराभूत केलं. आता आगामी निवडणुकीत लक्ष्मण हाके शहाजीबापू पाटलांना टफ फाईट देण्याची शक्यता आहे.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!