पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील अमोल ज्वेलर्सवर पहाटे 4 वाजता दरोडा पडल्याची घटना घडली असून 4 दरोडेखोर दुकानाचं शटर उचकटून, काचा फोडून आत घुसले. चोरट्यांनी लुटले अंदाजे 70 तोळे सोनं, 77 किलो चांदी
एकूण 1 कोटी 38 लाख 40 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
पायातील चांदीचे पैंजण, तोडे, वाळे, जोडवी आणि चैन, अंगठी
सोन्याचं गंठण, वाट्या, मनी, कर्णफुलं, राणीहार, टेम्पल हार चोरीला गेला आहे
दरोड्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सीसीटीव्हीपासून लपण्यासाठी केला छत्रीचा वापर केला
ज्वेलर्सचे मालक वैभव जोशी यांनी दिली शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद असून अधिक तपास सुरू आहे.