स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार)(SHARAD PAWAR) पक्षाने आपली रणनिती स्पष्ट करत जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाकडून आतापर्यंत साडेसातशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून, विविध ठिकाणी स्वबळावर तसेच महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जात असल्याची माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (SHASHIKANT SHINDE) यांनी दिली.
शिंदे यांनी सांगितले की, सहा ठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (SHARAD PAWAR) पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरला आहे. तर 11 ठिकाणी काँग्रेससोबत आणि 16 ठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत युती करून निवडणूक लढवण्यात येत आहे. महाविकास आघाडी एकसंघ असून, स्थानिक पातळीवर समन्वयाने उमेदवारी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
पुण्याच्या विकासाची पायाभरणी शरद पवार(SHARAD PAWAR) यांनी केल्याचे नमूद करत, अनेक पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिले असतानाही चर्चा केवळ अजित पवार(AJIT PAWAR) गटावर होत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. राखी जाधव(RAKHI JADHAV) यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षांतर केल्याचे सांगत, याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.