बदलापूर मधील चिमुरडी अत्याचार प्रकरणामुळे महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात असून सरकारकडून या प्रकरणात आता कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. विद्यार्थिनी वरील अत्याचार रोखण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.
बदलापूर मधील एका नामांकित शाळेत दोन चिमूट्यावर एका सफाई कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने पालकांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जातोय. बदलापूर मधील नागरिकांनी काल शहरात रास्ता रोको आणि रेल रोको आंदोलन केलं. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेत आरोपी अक्षय शिंदे यांच्या विरोधात पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
आणि सरकारने हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं जाहीर केलं असून हा खटला लढण्यासाठी सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकारकडून पावलं उचलायला सुरुवात झाली असून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सर्व शाळांमध्ये आता विशाखा समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे जाहीर केलंय
कॉर्पोरेट कार्यालयांच्या धर्तीवर सर्व शाळांमध्येही विशाखा समिती स्थापन होणार आहे. यात नववी-दहावीच्या विद्यार्थिनी प्रतिनिधी असतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली त्याच बरोबर प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आला आहे. खाजगी शाळांनाही सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आलाय. जर सीसीटीव्ही बंद असेल तर संपूर्ण जबाबदारी शाळेची असेल.