पुणे शहरात पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून शहरातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ शुक्रवारी रात्री एका मद्यधुंद वाहन चालकानं एकामागे एक अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तसेच चार जण जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली उमेश हनुमंत वाघमारे (वय 48) आणि नटराज बाबुराव सूर्यवंशी (वय 44) हे दोघे शुक्रवारी रात्री चार चाकी वाहनाने नारायण पेठ पोलीस चौककडून झेड ब्रिजकडे जात होते. दोघांनी मद्य प्राशन केले होते. त्यातील उमेश वाघमारे गाडी चालवत होता. भरधाव वेगाने गाडी चालवत त्याने रस्त्यावरील वाहनांना धडक देणे सुरु केले. त्याचवेळी रस्त्याने जाणाऱ्या पदचाऱ्यांनाही धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तसेच चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.