मोठी बातमी ! यूक्रेनविरोधात रशियाने पुकारले युद्ध, युक्रेनवर मिसाईलने हल्ला

244 0

मास्को – रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी उडाली असून यूक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. रशियाने युक्रेनवर मिसाईलने हल्ला चढवला असल्याचं वृत्त समोर आले आहे. त्यामुळे जगाला तिसऱ्या युद्धाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे असे संकेत मिळाले आहेत.

रशिया आणि युक्रेन यांच्यामधील संबंध चिघळू लागले आहेत. परिणामी यूक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केली आहे. किव, खारकीवसह चार शहरांवर मिसाईलनं हल्ला करण्यात आल्याचे वृत्त जागतिक वृत्त संस्थांनी दिले आहे.

युक्रेन हा रशियाचाच एकेकाळचा भाग होता. युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये अनेक सामाजिक, सांस्कृतिक तसंच आर्थिक संबंधही खोलवर रुजलेले आहेत. मात्र युक्रेन पाश्चिमात्य देशांची लष्कर संघटना असलेल्या नेटो मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. हीच बाब रशियाला मान्य नसल्यानं रशियाचे राष्ट्रपती वाल्मादिर पुतीन हे अधिकच आक्रमक झालेत.

रशियाने युक्रेनचे दोन तुकडे पाडले

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तणाव कायम आहे. याबाबत युरोपसह पाश्चात्य देशांनी दोन्ही देशांना चर्चा करुन तोडगा काढण्यास सांगितले होते. दरम्यान, रशियाने युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. यानंतर अमेरिका आणि युरोपसह इतर देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. तरीही रशियाने माघार घेतलेली नाही. युद्धाची घोषणा केली आहे.

Share This News
error: Content is protected !!