दि. 02 फेब्रुवारी रोजी पहाटे 03.30 वा. च्या सुमारास कॅब ड्रायव्हर व प्रवासी जात असताना चार अनोळखी इसमांनी गाडी अडवुन तक्रारदार ड्रायव्हरला मारहान करुन जबरदस्तीने तक्रारदाराच्या मोबाईल फोनवरून ऑनलाईन ट्रान्झेक्शन करून, त्यांचा मोबाईल व सोण्याची चैन हिसकावुन घेतल्याची घटना पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसरात घडली होती.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने केलेल्या ट्रान्झेवशन वरुन तसेच तांत्रिक पुराव्याच्या सहाय्याने मागोवा घेवुन सदरचे संशयीत आरोपी हे दादर, मुंबईला असल्याचे समजले. त्यानुसार तपास पथकाचे पोउपनि अजित बडे यांच्या सह तपास पथकाला तात्काळ मुंबई येथे खाना केले. सदर संशयीत आरोपी हे मुंबई मध्ये सतत जागा बदलत असल्याचे दिसुन येत होते. त्यांचा सातत्याने पाठलाग करून चारही आरोपींना दि. 03/02/2024 रोजी पहाटे 03.00 वा च्या सुमारास सांताक्रुझ रेल्वे स्टेशन परीसरातुन ते मुंबई मधून मध्य प्रदेश येथे जाण्याच्या तयारीत असताना ताब्यात घेतले. सदर गुन्ह्यात आरोपी 1) पियुष राजेश मरोठे 2) प्रणय आनंद लोंढे 3) आयुष संदिप पवार 4) रिहान सलीम खान सर्व रा.वानवडी, पुणे यांच्या कडुन चोरी गेलेला मोबाईल फोन, सोण्याची चैन तसेच गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटर सायकल देखील जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या खात्यामध्ये पैसे जमा झाले ते खाते गोठवण्यात आले आहे. असा एकुण 1,90,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, मा.अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त संदिप गिल, मा. सहा. पोलीस आयुक्त वसंत कुवर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पो. निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वात सपोनि बाजीराव नाईक, पोउपनि अजित बडे, सपोउपनि अविनाश भिवरे, पोहवा राजकिरण पवार, पोडवा मिलींद काळे, पोडवा गणपत वालकोळी, पोना सतिश कुंभार, पोशि प्रविण धडस, पोझि गणेश जाधवर, पोशि अर्जुन कुडाळकर, पोशि तुकाराम म्हस्के यांनी केली आहे.