Ratan Tata

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

593 0

मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून मोठ्या उद्योगपतींना धमक्यांचे कॉल येत आहेत. मुकेश अंबानी, सायरस मिस्त्री यांच्यानंतर आता टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा कॉल आला आहे. रतन टाटा यांची सुरक्षा वाढवा अन्यथा ते देखील सायरस मिस्त्री होतील, असं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं फोनवर म्हटलं आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली.

मुंबई पोलिसांनी फोन करणाऱ्याला पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन बंद लागला. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक मदत घेत टेलिकॉम कंपनीच्या सहाय्याने कॉलरचा शोध घेतला. त्याचे लोकेशन कर्नाटकात असल्याचं आढळलं. तर त्याचा पत्ता पुण्यातील असल्याचं समोर आलं. पुण्यात पोलिसांनी त्याच्या घराचा शोध घेतला. तिथे माहिती घेतली असता गेल्या पाच दिवसांपासून तो बेपत्ता आहे. तर त्याच्या पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार भोसरी पोलीस ठाण्यात दाखल केली असल्याचे समोर आले आहे.

यानंतर पोलिसांनी फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या घरच्यांची चौकशी केली तेव्हा संबंधित व्यक्तीला सिझोफेनिया असल्याची माहिती मिळाली. तो न सांगता घरातून फोन घेऊन गेला आहे. त्या फोनवरूनच मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमला कॉल करून रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फोन करणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sandeep Kshirsagar : ‘माझं घर जळत होतं अन्’…; आमदार संदीप क्षीरसागरांनी गंभीर आरोप करत सांगितला ‘त्या’ घटनेचा संपूर्ण घटनाक्रम

Pune News : रायसोनी कॉलेजचा विद्यार्थी आशुतोष खाडे याची एनएनएसच्या राष्ट्रीय साहसी शिबिरासाठी निवड

Pune Crime News : खळबळजनक ! केस पडल्याच्या रागातून जावयाकडून सासूवर प्राणघातक हल्ला

Beed News : दोन्ही मुंडे कुटुंबीयांचं बीड जिल्ह्यातील नेमकं योगदान काय? राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांचा सवाल

Winter Session : नितेश राणेंनी ‘तो’ फोटो दाखवत ठाकरे गटाच्या ‘या’ नेत्यावर केले गंभीर आरोप

Kangana Ranaut : स्मृती इराणींच्या मासिक पाळीसंदर्भातील ‘त्या’ विधानावर कंगना रणौतनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Majhi Kanya Bhagyashree Yojana : लेक जन्माला येताच ‘या’ योजनेद्वारे होणार लखपती

Maratha Reservation : मराठा आरक्षण विषयी छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्लीत बोलावली सर्व खासदारांची बैठक

Pune News : पुण्यात ATS ची मोठी कारवाई ! बेकायदा वास्तव करणाऱ्या 8 बांगलादेशी नागरिकांना अटक

Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका; रात्री उशिरा रुग्णालयात दाखल

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide