RAJ THACKERAY: “कुणाची माय व्यायलीये त्यानं मुंबईला, महाराष्ट्राला हात घालून दाखवावं..!” वाचा राज ठाकरेंच्या भाषणातील महत्वाचे 10 मुद्दे

83 0

RAJ THACKERAY: मुंबई : तब्बल 18 वर्षानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा गटाचे उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू ‘मराठी’साठी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं… यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक यांची उपस्थिती होती. स्टेजवर केवळ दोन खुर्च्या मांडल्या होत्या त्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंसाठी…! मागच्या बाजूला केवळ महाराष्ट्राचा नकाशा तो ही भगव्या रंगात आणि लिहलं होतं “आवाज मराठीचा” एक शब्द सर्व काही सांगायला पुरेसे होते. त्यांच्या ग्रँड एंट्रीनच सभागृह दणाणून टाकला… आतुरता होती राज ठाकरे यांच्या भाषणाची. सुरुवातीला राज ठाकरे यांनी ‘सन्माननीय उद्धव ठाकरे ‘ अशीच भाषणाची सुरुवात केली…. राज ठाकरे (RAJ THACKERAY) यांच्या भाषणातील १० महत्त्वाचे मुद्दे कोणते होते ते जाणून घेऊयात…

PUNE KONDHAVA NEWS:कोंढवा हादरलं! कुरियर बॉयचा 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार

1) मोर्चा निघायला पाहिजे होता

राज ठाकरे बोलताना म्हणाले, खरंतर मोर्चा निघायला पाहिजे होता. म्हणजे राज्यभरातून मराठी माणूस एकवटला असता आणि त्याची ताकद कळाली असती मात्र केवळ चर्चेनेच त्यांना माघार घ्यावी लागली.

2) जे बाळासाहेबांनाही जमलं नाही ते फडणवीसांना जमलं

आम्हाला एकत्र आणण,जे भल्याभल्यांना, बाळासाहेबांनाही जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांना जमलं असा टोला राज ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला

3) कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा!

कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही केवळ मराठी हाच अजेंडा याची राज ठाकरे यांनी पुनरावृत्ती केली. मराठी कडे मराठी माणसाकडे आणि महाराष्ट्राकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहायचं नाही असंही ते म्हणाले.

4) हिंदी कुठून आलं कळलं नाही.. विनाकारण आणलेला विषय

राज्य सरकारच्या हिंदी सक्ती बद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले हिंदी कुठून आलं कळलं नाही, सत्ता आहे म्हणून काहीही करायचं… तज्ञांचा सल्ला घ्यायचा नाही, तुमच्याकडे सत्ता आहे. आमच्याकडे सत्ता रस्त्यावर…! असे ते म्हणाले…

5) राज ठाकरेंनी काढली सर्वांची शाळा

सत्ताधाऱ्यांकडून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यादरम्यान त्यांची मुलं इंग्रजी माध्यमातून कॉन्व्हेंट स्कूल मधून शिकण्याची टीका करण्यात आली होती त्यावर बोलताना राज ठाकरेंनी अगदी सर्वांची शाळाच काढली… कुठे काय शिकले ? याचा काय संबंध ? कुणाची मुलं परदेशात शिकतात , शिकली याची आमच्याकडे यादीच आहे असं म्हणत राज ठाकरे यांनी चक्क यादी काढून कोण कोणत्या शाळेत शिकलं याची माहिती दिली. त्यातही सर्व मोठी नावं होती.

6) बाळासाहेबही इंग्रजीत शिकले

पुढे बोलताना त्यांनी बाळासाहेब आणि राज ठाकरेंचे वडील श्रीकांत ठाकरे दोघे देखील इंग्रजी माध्यमांमध्ये शिकल्याचं सांगितलं… त्यांच्यावरही शन्का घ्याल ? असा सवाल उपस्थित केला. पण मराठी भाषा, मराठी भाषेविषयी प्रेम हे त्यांच्या मनामध्ये होतं हे देखील सांगितलं.

*TOP NEWS MARATHI : राज ठाकरे यांचं कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं, उद्धव ठाकरे यांच्याकडून राज ठाकरेंचं कौतुक

7)कडवटपणा शिक्षणात नाही आत मध्ये असावा लागतो

पुढे बोलताना ते म्हणाले कडवटपणा हा शिक्षणात नाही तर आत मध्ये असावा लागतो. भाषेबद्दलचा आदर प्रेम सन्मान आणि बाहेरून नाही आतून असावा लागतो. उदाहरण देताना त्यांनी आपल्या भारतीय सैन्य तुकडी मध्ये वेगवेगळ्या राज्यातील रेजिमेंट असून सुद्धा शत्रू पुढे सर्वत्र एकत्र येऊन लढतात याचं उदाहरण दिलं.

8) मीरा भाईंदर प्रकरणाबाबत काय म्हणाले?

मीरा भाईंदर येथे झालेल्या प्रकरणाबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले मराठी आली पाहिजे यात वादच नाही ‘अजून तर काहीच केलेलं नाहीये…’चूक त्यांची असली पाहिजे. उगाच कोणालाही उठ सूट मारायला जाऊ नका… जास्ती नाटक केली तर कानाखाली काढले पाहिजे… आणि हो जे तुम्ही काय करता त्याचा व्हिडिओ काढू नका असंही राज ठाकरे यांनी आवर्जून सांगितलं.

9) राज ठाकरे यांनी सांगितले बाळासाहेब ठाकरेंची आठवण

राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगताना सांगितलं की त्या वेळेला सुरेश जैन हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत असा दोन्ही पक्षाकडून निर्णय झाला होता. मात्र मी जेव्हा बाळासाहेबांना ही गोष्ट सांगायला गेलो तेव्हा मात्र बाळासाहेबांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा मराठीच असला पाहिजे असं सांगितलं… बाळासाहेबांचे हेच बाळकडू घेऊन आलेली आम्ही मुलं आहोत मराठीसाठी लढणारच असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

10) मराठी वर कोणतीही तडजोड नाही

पुढे बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की युत्या आघाड्या होतच राहतील पण मराठी भाषा महाराष्ट्र आणि मराठी माणूस यावर कोणतीही तडजोड होणार नाही.

Share This News
error: Content is protected !!