PUNE VIMANNAGAR PUB BIRTHDAY VIDEO: पुण्यात कायद्याचं राज्य आहे की गुन्हेगारांचं राज्य आहे ? हा प्रश्न पडण्यासारखा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका कथित भाईने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांना जमवून पबच्या पार्किंगमध्ये बर्थडे सेलिब्रेशन केलं.
मोठमोठ्याने आरडाओरडा करत धुडगूस घातला.
आणि एवढं कमी की काय म्हणून सोशल मीडियावर याचे रील व्हायरल केले.
याच भाईच्या बर्थडेमुळे पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
PUNE VIMAN NAGAR PUB BIRTHDAY PARTY VIDEO : कथित भाईच्या बर्थडेसाठी गर्दी जमवून तरुणांनी घातला गोंधळ
शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील दत्त मंदिर चौकाजवळ
‘थ्री मस्केटियर्स’ पबच्या पार्किंगमध्ये एका गुंडाचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला.
यासाठी तब्बल शंभरहून अधिक गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी गर्दी केली होती.
या पार्टीचं आयोजन विमानतळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेल्या फिरोज शेख याने केलं होतं. तर बर्थडे होता या टोळीचा मोरक्या निखिल कांबळे याचा… या बर्थडे साठी पब च्या पार्किंग मध्ये डीजे लावण्यात आले.
एक-दोन, चार -पाच नव्हे नऊ केक आणण्यात आले.
Junner Crime News : जुन्नर मधील रिव्हर्स वॉटरफॉल जवळील दरीत आढळले मृतदेह
केकवर फायर कॅन्डल लावून फटाके फोडत केक कटिंग करण्यात आलं.
यादरम्यान हा कथित भाई एखादा सेलिब्रिटी असल्यासारखं सगळेजण त्याचे व्हिडिओ आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी लगबग करत होते.
Pune Crime News : व्हिडिओ बनवून तरुणाची आत्महत्या ; नेमकं कारण काय ?
ज्याचा बर्थडे होता त्या निखिल कांबळेवर येरवडा पोलिस ठाण्यात पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे.
या व्यतिरिक्तही त्याच्यावर अनेक गुन्हे असून बरेच दिवस कारागृहात शिक्षा भोगल्यानंतर काही दिवसांपूर्वीच तो सुटून बाहेर आलाय.
त्याला तुरुंगात नेतानाचे आणतानाचे व्हिडिओ फोटो ही
त्याच्या टोळीतील इतर गुंडांकडून व्हायरल करण्यात आले आहेत.
त्यातच आता या बर्थडे पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे या गुन्हेगारांची सोशल मीडियावर आणि पुणे शहरात चर्चा होत आहे.
या बर्थडे पार्टीत गुन्हेगारांचा भरणा होता. पुण्यातील अनेक गुन्हेगार यामध्ये सहभागी झाले होते..
पाहूया या पार्टीला नेमकं कोण कोण होतं..
गुन्हेगार नंबर 1- आकाश कंचिले उर्फ एके भाई- या कंचिलेवर खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, जबरी चोरी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये त्याने अनेकदा तुरुंगाची हवा खाल्ली आहे. विशेष म्हणजे हाच कंचिले खुनाच्या गुन्ह्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याच्या पंटरनी कारागृहाच्या बाहेर त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. तेव्हाही फटाक्यांची आतिषबाजी करत केक कापून एके भाईचा बर्थडे सेलिब्रेट करण्यात आला होता. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. अगदी त्याच पद्धतीने आत्ताची बर्थडे पार्टी ही रंगली. ज्यामध्ये एके भाई त्याच्या गॅंगला घेऊन सहभागी झाला होता.
गुन्हेगार नंबर 2. फिरोज शेख- या फिरोज शेख वर अनेक किरकोळ गुन्हे दाखल आहेत.तो विमानतळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार त्याच्याकडूनच ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टीमध्ये डीजे लावण्यापासून ते नंबरकार्यांना बोलवण्यापर्यंत सगळं काही याच फिरोजने केल्याची माहिती समोर येत आहे.
गुन्हेगार नंबर 3. निखिल कांबळे- या निखिल कांबळे वर देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. तो त्याच्या टोळीचा म्होरक्या आहे. त्याच्या पंटरकडून वारंवार हातात हत्यारं घेतलेले त्याचे फोटो व्हायरल केले जातात. विरोधी टोळ्यांना धमकावणारे स्टेटस टाकले जातात. याच निखिल कांबळेच्या बर्थडेसाठी हा पार्टीचा घाट घालणार आला होता.